Solar Rooftop Scheme 2026 : महाराष्ट्र राज्य सरकारने 30 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जाहीर केला. या निर्णयामुळे अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध घटकातील अनेक लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नवीन निर्णयानुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावरती 1KW क्षमतेची सौर उर्जा (Rooftop Solar System) बसवण्यासाठी ₹.45,000 इतके अनुदान मिळणार आहे.
या योजने मार्फत केंद्र सरकारच्या PM Surya Ghar मोफत वीज योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) यांचा समावेश असणार आहे. या लेखामध्ये आपण खाली संपूर्ण माहिती, फायदा, कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी या बद्दलची माहिती पाहणार आहोत.
आनंदाची बाब नेमकी काय आहे?
महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत SC व नवबौद्ध लाभार्थ्यांसाठी नवीन Rooftop Solar Scheme 2026 सुरू करण्यात आली.
या योजने मार्फत –
- 1KW सोलार ऊर्जा संच
- ₹.45,000 पर्यंत थेट अनुदान
- घरगुती वापरासाठी सोलार वीज
याचाच अर्थ वीज बिलात बचत आणि स्वावलंबन
Solar Rooftop Scheme 2026 ही सोलार योजना कोणासाठी आहे?
सदर योजना ही नसून ती एका विशिष्ट घटकांसाठी आहे. या मध्ये खालील घरांना प्राधान्य देण्यात येईल.
- इंदिरा आवास योजना लाभार्थी
- रमाई आवास योजना लाभार्थी
- प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी
लाभार्थी हा अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
1किलोवॅट सोलार सिस्टीम काय असते?
1किलोवॅट सोलार सिस्टीम म्हणजे –
- साधारण 4 सोलार पॅनल असतात.
- दररोज अंदाजे 4-5 युनिट वीज तयार होते.
- महिन्याला सुमारे 120-150 युनिट वीज निर्मिती.
याचा उपयोग कुठे होतो-
- पंखे, लाईट, टीव्ही
- मोबाईल चार्जिंग
- लहान फ्रिज
- घरगुती मूलभूत घटकांसाठी
- म्हणजे साध्या घरासाठी पुरेशी वीज
1kW Rooftop Solar साठी किती अनुदान मिळते?
| अनुदानाचा स्रोत | रक्कम |
| केंद्र सरकार (PM Surya Ghar) | ₹.30,000 |
| महाराष्ट्र राज्य सरकार | ₹.15,000 |
1kW Rooftop Solar साठी अंदाजे किंमत ₹.50,000 इतकी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना फक्त ₹.5000 इतका खर्च करावा लागणार आहे. बाकीची रक्कम सरकार मार्फत देण्यात येणार आहे.
महिन्याला 100 युनिट मोफत वीज कशी तयार होते?
1KW सिस्टीम मधून सरासरी-
- महिन्याला 120-150 युनिट वीज निर्मिती होते.
- 100 युनिट पर्यंत वीज मोफत वापरता येते.
- राहिलेली वीज ग्रीडमध्ये गेल्यास वीज बिलात समायोजन होते.

Solar Rooftop Scheme 2026 योजनेचे थेट फायदे
सदर योजने मार्फत आपणास खालील फायदे होणार आहेत.
- वीज बिलात मोठी बचत होणार आहे.
- विज गेल्यास घरात लाईट उपलब्ध होणार.
- पर्यावरण पूरक वीज.
- दीर्घकाळ टिकणारी गुंतवणूक.
- घराची किंमत वाढते.
आर्थिक फायदे कोणते-
- दरमहा 100 युनिट वीज मोफत.
- वर्षाला ₹.6,000 ते 7,000 वीज बिल बचत.
- दीर्घकाळात लाखो रुपयांची बचत होते.
तांत्रिक फायदे कोणते-
- 1 KW उच्च दर्जाची सोलर सिस्टीम
- ISI व MNRE मान्यताप्राप्त पॅनल
- 10 वर्षांची सोलर पॅनल वॉरंटी
- 5 वर्ष मोफत देखभाल व दुरुस्ती
सामाजिक व पर्यावरणीय फायदे कोणते-
- कार्बन उत्सर्जनात घट
- कोळसा व डिझेलवरील अवलंबन कमी
- हरित ऊर्जेला चालना
- SC व नवबौद्ध कुटुंबांचे जीवनमान उंचावते
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (SC / नवबौद्ध)
- आवास योजनेचा लाभार्थी पुरावा
- घराचे मालकी हक्क कागद
- वीज बिल / वीज कनेक्शन पुरावा
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्जदाराला इंदिरा आवास/रमाई आवास/प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळालेले असावे.
- घर प्रत्यक्ष वास्तव्याकरिता वापरात असावे.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
- घरात महावितरणचे वैध वीज कनेक्शन असावे.
- वीज ग्राहक थकबाकी मुक्त असावा.
- याआधी कोणत्याही सोलर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- आधार लिंक बँक खाते अनिवार्य आहे.
Solar Rooftop Scheme 2026 अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची साधारण प्रक्रिया:
- संबंधित जिल्हा समाजकल्याण कार्यालयात चौकशी करा.
- सोलर योजनेचा अर्ज फॉर्म मिळवा.
- सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
- पात्रतेची तपासणी केली जाते.
- मंजुरीनंतर अधिकृत विक्रेत्या मार्फत सोलर बसवला जातो.
महत्वाची सूचना-
- फक्त Empaneled Vendor कडूनच सोलर सिस्टीम बसवणे बंधनकारक आहे.
- आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात राज्य अनुदानासाठी अर्ज करा.
- सोलर बसवल्यानंतर तपासणी होऊन अनुदान DBT द्वारे खात्यात जमा होईल.
- योजना मर्यादित निधीवर आधारित आहे.
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द.
- अप्रमाणित Vendor कडून सोलर बसवू नका.
सोलर बसवल्यानंतर पुढे काय?
अधिकृत एजन्सी कडून सोलर इंस्टॉलेशनमीटर कनेक्शन व टेस्टिंग वापर सुरू वीज बिलात तात्काळ फरक दिसू लागतो.1 kW सोलर सिस्टमचा आयुष्यकालसाधारण 20–25 वर्षे असतो.
Rooftop Solar Scheme Maharashtra 2026 ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी महत्वाची योजना आहे. फक्त ₹5,000 खर्चात 1 KW सोलर, दरमहा 100 युनिट मोफत वीज, आणि ₹45,000 थेट अनुदान ही संधी दुर्लक्षित करू नका. पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा पूर्ण लाभ घ्या.