सरकार देत आहे 90% अनुदान; Kusum Solar Subsidy असा घ्या लाभ, लाईट बिलाच्या टेन्शन मधून कायमची होणार सुटका

Kusum Solar Subsidy : ग्रामीण भागातील भारनियमन आणि वाढते वीज बिल या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.09 जानेवारी 2026 च्या अपडेट नुसार ‘ प्रधानमंत्री कुसुम योजना ‘ (PM-KUSUM) व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी तब्बल 90% ते 95% पर्यंत अनुदान (subsidy) दिले जात आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून शून्य वीज बिलाचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

(PM-KUSUM) Kusum Solar Subsidy सौर पंप योजनेचे स्वरूप

ही योजना शेतकऱ्यांसाठी हे दोन विभागांमध्ये विभागली आहे.

  1. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) : या प्रवर्गामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच टक्के हिस्सा भरावा लागतो. म्हणजेच 95% अनुदान मिळते.
  2. सर्वसाधारण प्रवर्ग (जनरल/OBC) : या प्रवर्गामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के हिस्सा भरावा लागतो. म्हणजेच त्यांना 90 टक्के अनुदान मिळते.
  3. पंपाची क्षमता : 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप जमिनीच्या क्षेत्रानुसार उपलब्ध आहेत.

घरगुती ग्राहकांसाठी PM सूर्य घर योजना

केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर, शहरी आणि ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी PM सूर्य घर मोफत वीज योजना सुरू आहे.

  1. यामध्ये तीन किलो वॅट पर्यंतच्या सोलार सिस्टिमवर सरकार मोठी अनुदान देत आहे.
  2. यामुळे आपणास दरमहा 300 युनिट पर्यंत वीज अगदी मोफत मिळू शकते. आणि अतिरिक्त वीज सरकारला विकून तुम्ही पैसेही मिळवू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अटी

1. शाश्वत पाण्याचा स्त्रोत : शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोअरवेल असणे गरजेचे आहे.

2. जागेची उपलब्धता : सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी पुरेशी सावलीमुक्त जागा उपलब्ध असावी.

3. विद्युत जोडणी : ज्या ठिकाणी अद्याप वीज पोहचली नाही किंवा ज्यांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, त्यांना प्राधान्य दिले जाते.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा आणि 8-अ उतारा.
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • जातीचा दाखला (अनुदानासाठी).
  • पाणी उपलब्ध असल्याचा दाखला / शपथपत्र.

अर्ज कुठे आणि कसा करावा?

सौर कृषी पंपासाठी तुम्ही ‘महाकृषीऊर्जा’ (MahaKrushiUrja) च्या अधिकृत पोर्टलवर किंवा ‘महावितरण’ च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्जासोबत कोटेशन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तांत्रिक पडताळणी होते आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा हिस्सा (Beneficiary Share) भरण्यासाठी SMS येतो.

तुम्ही पैसे भरल्यानंतर काही दिवसांतच अधिकृत एजन्सी मार्फत तुमच्या शेतात सौर पंप बसवून दिला जातो. या योजनेमुळे केवळ वीज बिलच वाचणार नाही, तर पर्यावरणाचे रक्षण पण होणार आहे.

Leave a Comment

WhatsApp

Powered by Webpresshub.net