2kW Solar System Cost 2kW सोलार सिस्टीम बसवण्यासाठी 60000 अनुदान घेतले तर खर्च किती येईल पहा सविस्तर

2kW Solar System Cost : आजच्या काळात सौर ऊर्जा हे वीज निर्मितीचा एक उत्तम स्रोत तयार झाला आहे. तुमच्या घरच्या सामान्य वीज गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरावर 2 किलोवॅटची सोलार सिस्टीम बसवू शकता. यासाठी आपणास 200 चौरस मीटर जमीन हवी. 2 किलोवॅटची सोलार सिस्टीम लहान कुटुंबाच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.

ज्या कुटुंबाचे विज बिल दर महिन्यास 15 ते 300 युनिट येत आहे त्यांच्यासाठी दोन किलो वॅट सौर ऊर्जा सिस्टीम बसवणे हा एक उत्तम पर्याय आहे. ही यंत्रणा दर दिवसाला दहा ते बारा युनिट वीज तयार करते.

2 किलोवॅटची सोलार सिस्टीमची बॅटरी आणि सबसिडी सह किती खर्च येतो ते पाहूया 2kW Solar System Cost

2 किलोवॅटची सोलर सिस्टिम बसवण्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनल किंवा पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनल बसवू शकता. हे दोन्ही पॅनेल्स घरामध्ये बसवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. दोन किलो वॅट सोलर सिस्टिम बसवण्यासाठी आपण 250 वॅट्सचे आठ पॅनल्स घेऊ शकता किंवा 335 वॅट्सचे सहा पॅनल्स घेऊ शकता. क्षेत्रफळानुसार तुम्ही तुमच्या घरावर पॅनल्स निवडू शकता.

दोन किलो वॅट सोलर सिस्टम साठी आपणास प्रत्येकी 150 ah च्या 2 बॅटरीची आवश्यकता लागेल. नवीन बॅटरी खरेदी करताना आपणास पाच वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.

बॅटरी आणि अनुदानासह किती होईल किंमत..

आता यामध्ये दोन किलोवॅट सोलर सिस्टिम ची किंमत प्रामुख्याने तुम्ही कोणत्या कंपनीकडून खरेदी करणार आहे यावर अवलंबून राहते. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या सोलर पॅनल आणि बॅटरी ची किंमत वेगवेगळी राहते. संपूर्ण सौर यंत्रणा सौर पॅनल, बॅटरी, इन्व्हर्टर आणि पॅनलच्या संरचनेने बनलेली असते. मार्केटमधील या सर्वांची किंमत गुणवत्तेवर अवलंबून राहते.2kW Solar System Cost

2kW ऑफ -ग्रीड सोलर सिस्टिम बसवण्यासाठी किती खर्च येईल याची माहिती खाली दिली आहे.

  • सौर पॅनल 250 वॅट किंवा 335 वॅट
  • 250 वॅट चे 8 पॅनल किंवा 335 वॅट चे 6 पॅनल
  • सोलर इन्वर्टर 3KVA
  • सौर बॅटरी 150AH च्या 02 बॅटरी
  • डीसी केबल 20 मीटर
  • AC केबल 20 मीटर
  • क्षेत्र 200 चौरस मीटर (म्हणजे जवळपास 02 गुंठे)
  • सोलर पार्ट आर्थिग किट, क्रिमिंग टुल, लायटिंग अरेस्टर

2 kW सोलार सिस्टम मध्ये आपणास एकूण 2 हजार vat क्षमतेचे मोनो किंवा पॉली सोलर पॅनल घ्यावे लागतील ज्याची किंमत सुमारे 70,000 रु.इतकी आहे. व्यतिरिक्त आपणा सोलर इन्व्हर्टर सुमारे 25,000 रु., सौर बॅटरी 30,000 रु. आणि स्टँड बसवण्यासाठी 15,000 रु. खर्च येतो.

म्हणजेच चांगली 2 kW सोलर सिस्टिम बसवण्यासाठी आपणास 1,40,000 ते 1,60,000 रु. इतका खर्च येईल.

मित्रांनो यामध्ये आपण 2kW सोलर ची किंमत पाहिली आहे. परंतु कंपनी नुसार यामध्ये थोडा फार बदल देखील होऊ शकतो. आम्ही आपणास एक अंदाजे रक्कम सांगितली आहे.यामध्ये सोलार पॅनल बसवण्याचे देखील शुल्क समाविष्ट असतील.आपणास संपूर्ण सिस्टमची 05 वर्षे वारंटी दिली जाईल परंतु सोलर पॅनलची 25 वर्षांची वारंटी दिली जाईल.

ऑन-ग्रीड सोलर सिस्टम बसवल्यास किती सबसिडी मिळेल?

या सोलर सिस्टममध्ये इन्वर्टर आणि सोलर पॅनल वापरले जातात, यामध्ये बॅटरी वापरण्यात येत नाहीत. यामुळे ऑफ ग्रीड सोलर सिस्टम पेक्षा हे थोडे स्वस्त आहे असल्याने सरकारकडून अनुदान मिळते. जे लोक घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवतील अशा लोकांना अनुदान मिळणार आहे.1 ते 3 Vat सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून 20,000 रु. प्रति kw अधिक अनुदान मिळेल, तर 4 ते 10kw सोलर सिस्टिमला 10,000 रु.प्रति kw अनुदान मिळेल .हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये तीन महिन्यात येईल. राज्यानुसार अनुदानाच्या रक्कमेत थोडा फार बदल होऊ शकतो. 2kW Solar System Cost

निष्कर्ष : एक चांगली 2kW सोलर सिस्टिम बसवण्यासाठी अनुदान वगळता तुम्हाला 70,000 ते 1,00,000 रु. खर्च करावे लागतील.

Leave a Comment

WhatsApp

Powered by Webpresshub.net