Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना! फक्त 10% रक्कम भरून सोलर पंप; पहा संपूर्ण माहिती..

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी एक फायदेशीर आणि महत्वाची योजना ती म्हणजे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सदरील योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना सिंचनासाठी दिवसा स्थिर वीज पुरवठा मिळेल, तसेच वीजबिल आणि लोडशेडिंगचा त्रास पण कमी होणार आहे.

या योजनेमध्ये सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता फक्त 10% रक्कम भरून सोलर पॅनेलसहित कृषी पंपाचा पूर्ण संच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे फायदे आणि उद्देश काय आहे ते.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Benefit-योजनेचा मुख्य फायदा

सदर योजनेचा मोठा फायदा म्हणजे खर्चाचा जो भार आहे तो कमी होणार आहे.

1.सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी –

  • एकूण खर्चाच्या फक्त 10% रक्कम ही शेतकऱ्याने भरायची आहे.
  • बाकीची रक्कम (90%) ही केंद्र आणि राज्य सरकार अनुदान स्वरूपात भरते.

2.SC/ST शेतकऱ्यांसाठी –

  • 5% हा लाभार्थी हिस्सा असेल
  • बाकीची रक्कम ही सरकार अनुदान स्वरूपात मिळेल

म्हणजेच कमी खर्चात शेतकऱ्यांना पूर्ण सौर पंप संच मिळेल.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana कोणत्या सुविधा मिळतात?

‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ या योजने मार्फत पंप बसवल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील फायदे मिळतील:

  • 5 वर्षांची दुरुस्ती हमी (Warranty/Repair Support)
  • विमा संरक्षण (Insurance)
  • वीजबिलाचा खर्च कमी
  • लोडशेडिंगचा त्रास नाही
  • दिवसा स्थिर वीज उपलब्ध म्हणजेच सिंचन अधिक सोपे

सदरील योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर ठरते ज्याना:

  • रात्री सिंचन करावे लागते
  • कमी वीजपुरवठा मिळतो
  • वारंवार वीज खंडित होते

जमीन क्षेत्रानुसार कोणता सौर पंप मिळेल? (HP नियम)

  •  2.5 एकरपर्यंत जमीन असेल तर-3 HP पर्यंत सौर कृषी पंप
  • 2.51 ते 5 एकर जमीन असेल तर-5 HP सौर कृषी पंप
  •  5 एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर-7.5 HP सौर कृषी पंप

यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार योग्य क्षमतेचा पंप मिळतो.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Eligibility Rules

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असणे गरजेचे आहे.

आवश्यक असणारे पाण्याचे स्त्रोत:

  • विहीर
  • बोअरवेल
  • शेततळे

महत्वाच्या अटी:

  • महावितरण तुमच्या पाणाच्या स्त्रोताची खात्री करेल
  • जलसंधारण साठ्यातील पाणी उचलण्यासाठी हे पंप वापरता येणार नाहीत

याचाच अर्थ अर्ज करताना शेतकऱ्यांनी आधीच पाण्याची उपलब्धता निश्चित करणे गरजेचे आहे.

अगोदर लाभ घेतला असेल तर काय?

सदर योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी आधीच्या सोलर पंप योजनांचा लाभ घेतलेला नाही.

  • अटल सौर कृषी पंप योजना 1 आणि 2
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

यांचा लाभ ज्यांनी घेतलेला नाही, त्यांनाच या अभियानात संधी मिळू शकते.

 बारामती विभागातील प्रगती (अर्ज आणि बसवणी स्थिती)

बारामती विभागातील योजनेची प्रगती पाहता या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येतो.

  • सुमारे 7,300 शेतकऱ्यांनी अर्ज करून पैसे भरले आहेत.
  • 5,968 शेतकऱ्यांनी व्हेंडर (Vendor) निवडला आहे.
  • 3,137 शेतकऱ्यांचे पंप बसवून झाले आहेत.
  • 2,369 पंप सुरू झाले आहेत.

 तसेच पुरवठादार कंपनीला 60 दिवसांच्या आत पंप बसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि थोडक्यात माहिती

  1. सर्वसाधारण शेतकरी: 10% भरून सौर पंप
  2. SC/ST शेतकरी: 5% भरून सौर पंप
  3. जमीन क्षेत्रानुसार पंप: 3 HP / 5 HP / 7.5 HP
  4. 5 वर्ष वारंटी + विमा
  5. वीजबिल व लोडशेडिंगपासून दिलासा
  6. पाण्याचा शाश्वत स्रोत आवश्यक
  7. आधीच्या सौर पंप योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

टीप : वरील माहिती ही अपूर्ण असू शकते. आम्ही माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेत असतो. अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Leave a Comment

WhatsApp

Powered by Webpresshub.net