12th Old Paper Download : मित्रांनो 12 वी ची परीक्षा ही आपल्या शैक्षणिक आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. कारण चांगले मार्क मिळवण्यासाठी फक्त पाठांतर पुरेसे नसून, त्यासाठी मागील वर्षांचे जुने पेपर सोडवणे ही फार महत्वाचे आहे.मागील जुने पेपर सोडवल्याने प्रश्नांची पद्धत, मार्क वाटप आणि महत्वाचे धडे मिळतात.यासाठीच आम्ही आपणास या लेखामध्ये 12 वी चे जुने पेपर कसे आणि कुठून डाउनलोड करायचे या बद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला जाणून घेऊया या बद्दलची माहिती.
12th Old Paper Download जुने पेपर कुठे मिळतील?
आपणास सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्यावी लागेल. https://www.mahahsscboard.in/en/questionPaper इथे जाऊन आपण हे पेपर मिळवू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचे जुने प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात.
पेपर डाउनलोड करण्याची सोपी पद्धत:
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Examination” किंवा “Question Paper” हा पर्याय निवडा.
- त्यानंतर इयत्ता 12वी (HSC) निवडा.
- आता वर्ष आणि विषय निवडा.
- PDF फाईल डाउनलोड करा.
How To Download 12th Old Paper
तुम्हाला अनेक शैक्षणिक वेबसाइट आणि मोबाइल अॅप्स द्वारे बारावीचे जुने पेपर PDF स्वरूपात मिळतील.काही वेबसाइट वरती विषयानुसार तसेच वर्षानुसार पेपर देण्यात आलेले आहेत.
सूचना : पेपर फक्त सुरक्षित वेबसाइट वरूनच डाउनलोड करा.
कोणत्या विषयाचे पेपर उपलब्ध असतील?
- मराठी
- हिंदी
- इंग्रजी
- गणित
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- इतिहास
- भूगोल
- अर्थशास्त्र
- बुक-कीपिंग व अकाउंटन्सी
- संगणकशास्त्र
वरील विषयाचे पेपर आपणास पहावयास मिळतील.
बारावीचे जुने पेपर डाउनलोड करण्याचे फायदे
- परीक्षेच्या प्रश्नांची पद्धत समजते.
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न ओळखता येतात.
- वेळ व्यवस्थापन सुधारते.
- तुमचा आत्मविश्वास वाढतो.
- सरावामुळे गुणांमध्ये वाढ होते.
जुने पेपर वापरण्याची पद्धत
- आधी संपूर्ण अभ्यास पूर्ण करा.
- पेपर ठराविक वेळेत सोडवण्याचा सराव/प्रयत्न करा.
- उत्तरपत्रिका तपासून पहा आणि चुका नोंदवा.
- वारंवार येणाऱ्या प्रश्नांची स्वतंत्र वही तयार करा आणि त्या द्वारे अंबलबजावणी करा.
महत्वाच्या सूचना
- नवीन अभ्यासक्रम (Updated Syllabus) लक्षात घेऊनच जुने पेपर वापरा.
- मॉडेल पेपर आणि सॅम्पल पेपर देखील सोडवा.
- अधिकृत स्रोतावरूनच प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
महत्वाचे : बारावीचे जुने पेपर डाउनलोड करून नियमित सराव केल्यास परीक्षेची भीती कमी होते आणि चांगले गुण मिळवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आजच अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपल्या विषयांचे मागील वर्षांचे पेपर डाउनलोड करा आणि तयारीला सुरुवात करा.
टीप : वरील माहिती ही अपूर्ण असू शकते. आम्ही माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेत असतो. अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Thank You!