LPG Price : सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती सोबतच घरगुती गॅस सिलेंडर (LPG) मध्ये होणारे मोठे बदल थेट गृहिणींच्या बजेट परिणाम करतात. सातत्याने गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या काही काळामध्ये वाढत होत्या, मात्र सध्या केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी सकारात्मक बातमी समोर येत आहे.
आजच्या लेखामध्ये आपण घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर, किंमती ठरवण्यामागील कारणे आणि सरकारमार्फत देण्यात आलेल्या सवलती बाबत सविस्तर माहिती बघणार आहोत.
LPG Price घरगुती गॅस सिलेंडर नवीन दर
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेस सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेत असतात आणि नवीन दर जाहीर करतात. हे दूर कधी वाढतात आणि कमी देखील होतात.
प्रमुख शहरांमधील अंदाजित दर (१४.२ किलो सिलेंडर)
| शहर | अंदाजित रक्कम (रुपये) |
| मुंबई | ८०२.५० |
| पुणे | ८०५.०० |
| दिल्ली | ८०३.०० |
| कोलकाता | ८२९.०० |
| चेन्नई | ८१८.५० |
टीप : हे दर अंदाजित असून स्थानिक कर (Local Taxes) आणि ट्रान्सपोर्टेशन शुल्कामुळे प्रत्येक जिल्ह्यात थोडेफार बदलू होऊ शकतात. तुमच्या शहरातील अचूक दर पाहण्यासाठी तुम्ही ‘Indian Oil One’ किंवा ‘Indane’ च्या अधिकृत ॲपवर जाऊन तपासू शकता.
गॅस स्वस्त होण्याची प्रमुख कारणे
गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक घटक कारणीभूत ठरवत असतात.
१. कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या की त्याची सकारात्मक परिणाम एलपीजी दरांवर होतात.
२. डॉलरचा विनिमय दर : भारत हा मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो. डॉलरच्या तुलनेत जर रुपया मजबूत झाला तर, आयात शुल्काचा खर्च कमी होतो आणि गॅस स्वस्त होऊ शकतो.
३. सरकारी अनुदान : सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सबसिडीमध्ये वाढ करते किंवा मूळ किमतीमध्ये कपात करण्याची घोषणा करते.
४. निवडणुकीचा परिणाम : जनतेला खुश करण्यासाठी सरकार निवडणुकांपूर्वी अनेकदा गॅसच्या किमतीत मोठी कपात करते.
प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) आणि सवलत
सामान्य लोकांसाठी गॅस सिलेंडर हा ८०० ते ९०० रुपये जरी असला तरी, प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मोठी सूट मिळते.
१.३०० रुपयांची सबसिडी : केंद्र सरकार मार्फत उज्वला योजना लाभार्थ्यांची सबसिडीची रक्कम वाढवून ३०० रुपये केली आहे.
२. प्रभावी किंमत : तीनशे रुपयांची सबसिडीच्या ग्राहकांना मिळते त्यांना सिलेंडर साधारणपणे ५०० ते ६०० रुपयांच्या आसपास मिळतो. यामुळेच ग्रामीण भागातील महिलांना फक्त स्वयंपाकघर मिळण्यास मोठी मदत झाली आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातील बदल
केवळ घरगुतीच नाही तर,१९ kg च्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती मध्येही वारंवार बदल होत असतात. हॉटेल आणि छोट्या व्यवसायिकांसाठी हे दर अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे जेवण आणि खाद्यपदार्थांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते.
तुमच्या शहरातील गॅसचे दर मोबाईलवर असे तपासा
आपणास गॅस एजन्सीवर न जाता असल्या नवीन दर बघायचे असल्यास खालील पद्धतींचा उपयोग करावा.
- अधिकृत वेबसाइट : सर्वप्रथम Indian Oil किंवा HP Gas च्या वेबसाइटला भेट द्या.
- SMS द्वारे : तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून गॅस कंपनीला ठराविक फॉरमॅटमध्ये मेसेज करून तुम्ही SMS द्वारे नवीन दर जाणून घेऊ शकता.
- ॲप्स : ‘Indane’, ‘Paytm’, किंवा ‘PhonePe’ सारख्या ॲप्सवर ‘Book Cylinder’ पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला आजचा चालू दर तिथे दिसतो.
गॅस सिलेंडर बुक करताना पैसे कसे वाचवावे?
१. डिजिटल पेमेंट ऑफर : Paytm, Amazon Pay किंवा Google Pay वरून गॅस बुक करताना अनेकदा कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात या द्वारे आपण पैसे वाचवू शकता.
२.सबसिडी स्टेटस तपासा : तुमचे बँक खाते गॅस कनेक्शनशी जोडलेले आहे की नाही याची खात्री करा, जेणेकरून मिळणारी सबसिडी (अनुदान) थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
३.गॅसची बचत : तुम्ही स्वयंपाक करताना झाकण ठेवून शिजवणे, पाण्याचे योग्य प्रमाण वापरणे आणि गॅसची शेगडी वेळोवेळी स्वच्छ ठेवल्याने १५ ते २० टक्के गॅसची बचत करू शकता.
निष्कर्ष
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारी कपात ही मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे किमतीत चढ-उतार होत असले, तरी सरकारकडून मिळणारी सबसिडी ही सामान्य माणसासाठी मोठा आधार ठरत आहे.
टीप : वरील माहिती ही अपूर्ण असू शकते. आम्ही माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेत असतो. अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.