Solar Pump : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीत राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाची आणि उपयुक्त बातमी समोर आली आहे.2026 साठी सौरचलित फवारणी पंपावर शासनाकडून अनुदान मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हा अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून सहज करू शकता.
शेती आधुनिक करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते,त्यामधील सौरचलित फवारणी पंप योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. यामुळे खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ शक्य होणार आहे. पूर्वी अर्जासाठी सायबर कॅफे मध्ये जावे लागायचे रांगेत उभे राहून वेळ वाया जायचा आता मात्र ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांत अर्ज करता येतो.
सौरचलित फवारणी पंपाचे महत्त्व आणि फायदे
शेतामध्ये औषध फवारणी करणे हे अत्यावश्यक काम आहे. बहुतेक शेतकरी पेट्रोल किंवा डिझेल वर चालणारा पंप वापरतात यामुळे प्रत्येक वेळी इंधन खर्च वाढत जातो. पंप खरेदी केल्यानंतरही इंधनासाठी वारंवार पैसे खर्च करावे लागतात याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होतो.
नफा कमी होण्यामागे हा एक मोठा कारण ठरतो. यावर उत्तम पर्याय म्हणजे सौरचलित फवारणी पंप हा पंप सूर्यऊर्जेवर चालतो एकदा खरेदी केल्यानंतर इंधन खर्च शून्य होतो.धूर नाही प्रदूषण नाही आणि आवाजही कमी पर्यावरणपूरक शेतीसाठी हा उत्तम पर्याय आहे हीच खरी स्मार्ट शेतीची दिशा आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील मोठा बदल
शेती योजनांसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलचा वापर करावा लागतो. पूर्वी लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने केली जात होती, म्हणून अर्ज करूनही खात्री नसायची आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर योजना राबवली जाणार आहे जो आधी अर्ज करेल त्याला आधी लाभ मिळणार आहे.म्हणून विलंब करू नका लवकर अर्ज करणे फायदेशीर ठरणार आहे. अनुदान मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
फार्मर आयडी अनिवार्य
महाडीबीटीवर लॉगिन करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहेफार्मर आयडी शिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाहीम्हणून अर्जापूर्वी आयडी तयार असल्याची खात्री कराफार्मर आयडी शोधणे सोपे आहेआधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आवश्यक आहेओटीपीद्वारे ओळख पटवली जाते.
फार्मर आयडी कसा शोधावा
- मोबाईलमध्ये गुगल क्रोम उघडा.
- सर्च बारमध्ये mahadbt farmer login लिहा.
- agri login लिंकवर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करून सूचना वाचा.
- तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय निवडा.
- आधार क्रमांक टाका आणि ओटीपी घ्या.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
- तुमचा शेतकरी ओळख क्रमांक स्क्रीनवर दिसेल.
- तो जतन करून ठेवा.
- यानंतर ओटीपीद्वारे लॉगिन पूर्ण करा अशाप्रकारे तुम्ही पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता.
सौरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
लॉगिन झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- अर्ज करण्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण निवडा.
- कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडा
- तपशीलामध्ये मनुष्यचलित औजारे निवडा.
- पिक संरक्षण औजारे निवडा.
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप निवडून टिक करायानंतर जतन करा वर क्लिक करा
- इतर अर्ज नसल्यास नो निवडा व नंतर अर्ज सादर करा वर क्लिक करा.
अर्ज शुल्क आणि पेमेंट
अर्जासाठी २३.६० रुपये इतके नाममात्र शुल्क आहे. हे शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही. पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करावे लागते. नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा क्यूआर कोड पर्याय उपलब्ध आहे.क्यूआर कोड वापरून पेमेंट करणे अधिक सोपे आहे.पेमेंट यशस्वी झाल्यावर पावती मिळते.
अर्जाची पावती जतन करा
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पावती घेणे अत्यंत आवश्यक आहे. घटक इतिहास पहा या पर्यायावर क्लिक करा.लागू केलेले घटक निवडा.पावती पहा या पर्यायातून पावती डाउनलोड करा.ती पीडीएफ स्वरूपात जतन करा.गरज पडल्यास प्रिंट काढून ठेवा.
योजनेचा थोडक्यात आढावा
योजनेचे नाव सौरचलित फवारणी पंप योजना अर्ज पद्धत ऑनलाईन लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी आणि आधार क्रमांक अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध अनुदान प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
सौरचलित फवारणी पंपामुळे खर्च कमी होणार आहे. इंधनाचा त्रास संपणार आहे. पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार आहे. मित्रांनो वेळ न दवडता अर्ज करा. मोबाईलवरून काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा. 2026 मध्ये अनुदानाचा लाभ घ्या आणि शेती अधिक सक्षम बनवा.
ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. आपली शेती आधुनिक आणि नफ्याची बनवूया.