Solar Panel yojana : मित्रांनो आपल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये सुद्धा प्रचंड वाढ होत चालली आहे. सध्या वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कोळसा सुद्धा अपुरा पडत असून,पारंपरिक वीज निर्मिती साधने सुद्धा अपुरी पडत आहेत. त्यामुळे देशाला येणाऱ्या पुढच्या काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने Solar Panal Yojana राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Solar Panel yojana मुख्य उद्देश काय?
- रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने महिन्याच्या घरगुती बिलात बचत करणे.
- रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे.
- पारंपारिक उर्जा स्तोत्र वरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे.
- राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- राज्यातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यावरील विजेचा अतिरिक्त भार कमी करणे.
- प्रदूषण विरहित वीजनिर्मितीला प्रोत्साहन देणे.
Solar Panel yojana योजनेची वैशिष्ट्ये
- रूफटॉप सोलर योजना (solar panel yojana) महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40% अनुदान देण्यात येते.
- रुफटॉप सोलर योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- या योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
रूफटॉप सोलर योजनेचे लाभार्थी कोण
महाराष्ट्रातील असे नागरिक जे स्वतःच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी इच्छुक असतील. या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेसाठी पात्र असतील.
Solar Panel yojana रूफटॉप सोलर योजनेचे फायदे
- वरील योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान दिले जाईल.
- या योजनेमुळे विजेच्या बिलात मोठी बचत होते.
- अंदाजे 25 वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
- 5 ते 6 वर्षात या योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते.
- रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी 30 पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- मोबाईल क्रमांक.
- अर्जदाराचे बचत बँक खाते.
- अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
- अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदार संमतीपत्र.
- चालू विज बिल.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला.
- अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
- सर्व प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या वेबसाइट वर जावे लागणार आहे.
- वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं कस्टमर क्रमांक या ठिकाणी टाकून चेक करावे लागणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
- पुढे गेल्यानंतर तुम्हाला वर तीन पर्याय दिले आहे या पहिल्या पर्यायात तुम्हाला तुमचं संपूर्ण फॉम भरायचा आहे.
- त्यानंतर दुसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करावे लागणार आहे.
- नंतर तिसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमची एजन्सी सिलेक्ट करावी लागणार आहे.
- नंतर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत.
- हे सर्व झाल्यानंतर तुमचं अर्ज या ठिकाणी पूर्ण होईल.
Solar Panel yojana दिले जाणारे अनुदान
1.घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.
2. 3 किलोवॅट व त्यापेक्षा अधिक 10 किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.
3. गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.
टीप : वरील माहिती ही अपूर्ण असू शकते. आम्ही माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेत असतो. अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.